विश्व मराठी परिषद
2.55K subscribers
60 photos
5 videos
1 file
112 links
कोट्यवधी मराठी बांधवाना जोडणारी संस्था | साहित्य, संस्कृती, उद्योजकता. विविध उपक्रम, कार्यक्रम, उपयुक्त माहिती इथे मिळेल
Download Telegram
जो बोलेल त्याची मातीही विकली जाईल आणि ज्याला बोलता येत नाही त्याचे सोनेही पडून राहील..!

यशस्वी वक्ता बना...
उत्तम संवादकौशल्ये प्राप्त करा...
प्रभावी सूत्रसंचालक बना...
कार्यक्रमांचे आयोजन करा....

विश्व मराठी परिषद आयोजित,
ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम
वक्तृत्व, संवादकौशल्ये, सूत्रसंचालन आणि कार्यक्रम आयोजन

प्रभावी वक्ता, सूत्रसंचालक व कार्यक्रम आयोजक म्हणून मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध...

▪️मार्गदर्शक : डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
पूर्वाध्यक्ष - अखिल भारतीय साहित्य महामंडळ, प्रख्यात वक्ते, व्याख्याते, ज्येष्ठ कवी, लेखक, संवाद - माध्यम तज्ज्ञ, समीक्षक, संपादक

▪️ वयोमर्यादा : किमान १५ वर्षे आणि पुढे.
▪️कालावधी : ४ महिने (०२ ऑक्टोबर २०२२ ते २६ जानेवारी २०२३).
▪️ वेळ : सोमवार ते शुक्रवार (रोज संध्या. ७ ते ८).
▪️ ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग : झूमद्वारा.
▪️ रेकॉर्डिंग उपलब्ध
▪️ दोन दिवसीय प्रत्यक्ष मार्गदर्शन शिबिर पुणे येथे.
▪️ मर्यादित जागा. त्वरित प्रवेश घ्या.
▪️ नोंदणीची अखेरची तारीख : २० सप्टेंबर, २०२२.

👉 ऑनलाईन नोंदणी करा: www.vishwamarathiparishad.org/vakta

👉सविस्तर माहितीसाठी : संकेतस्थळाला भेट द्या अथवा 7066251252 या व्हॉटसअप क्रमांकावर 'वक्ता अभ्यासक्रम' असा व्हॉटसअप संदेश पाठवा.

👉 संपर्क :
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य संयोजक
मोबाईल : 7507207645
व्हॉट्सअप : 7066251262
*साहित्य संस्कृती जागर परिक्रमा* ( चालत ) प्रभानवल्ली ते धूतपापेश्र्वर - रत्नागिरी जिल्हा - *शनिवार २९ ऑक्टोबर ते बुधवार २ नोव्हेंबर,* २०२२ *आयोजक - विश्व मराठी परिषद पुणे* आँनलाईन नोंदणीची अखेरची तारिख १५ ऑक्टोबर २०२२

*निःशुल्क प्रवेश - प्रत्येकाला प्रमाणपत्र मिळेल*

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली पासून राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वर मंदिरापर्यंत ५ रात्री आणि ६ दिवस अशी एकूण ६ दिवसांची साहित्य संस्कृती जागर परिक्रमा आयोजित केली आहे. आजच्या तरुणाईला खऱ्या भारताची ओळख होण्यासाठी प्रत्यक्ष खेड्यात जाऊन तेथील संस्कृती आणि लोक जीवन याची अनुभूती घेण्यासाठी आणि तेथील ग्रामस्थ बंधू भगिनी बरोबर मनमोकळा संवाद साधून खरा भारत जाणून घेण्याची संधी देणारी ही एक अनोखी परिक्रमा आहे. यातून इंडियाची भारताशी ओळख होईल.

१) यामध्ये १८ ते ३५ वयोगटातील युवा बंधू भगिनीना प्रवेश असेल. सुमारे १२५ जणांना यामध्ये प्रवेश दिला जाईल.

२) *निःशुल्क प्रवेश* ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर विश्व मराठी परिषदेतर्फे आपली निवड झाल्याचे कळविण्यात येईल.

३) परिक्रमेदरम्यान रोजचे चालणे सुमारे १२ ते १५ किलोमीटर असेल. परिक्रमेदरम्यान प्रभानवल्ली हा छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि स्वराज्याला सर्वात जास्त महसूल देणारा सुभा, खोरनिनको येथील मुचकुंदी नदीचा उगम आणि धरण, बल्लाळेश्वर मंदिर , शिवकालीन गढी, वेरवली, लांजा, ओणी, राजापूरची गंगा, उन्हाळे येथील गरम पाण्याचे झरे, इंग्रजांच्या वखारीचे अवशेष, प्राचीन धूतपापेश्वर मंदिर इ. स्थळांना भेट देणार आहोत. निसर्गाच्या सानिध्यात डोंगर दऱ्यातून चालताना तळकोकणाचे अद्भुत सौंदर्य अनुभवायला मिळेल.

४) परिक्रमेमध्ये निवासाच्या ठिकाणी ( शाळा,आश्रम, मंदिर, गावकऱ्यांची घरे ) यामध्ये राहण्याची सामुदायिक (एकत्रित) स्वरूपाची व्यवस्था आहे. पुरुषांची स्वतंत्र आणि महिलांची स्वतंत्र अशी असेल. ( स्नान व स्वच्छतेसाठी उपलब्ध सोयी सुविधा असतील त्याप्रमाणे आहेत )

५) निवासाच्या ठिकाणी आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी आणि प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर चर्चा, गप्पा-गोष्टी आणि विचारांची देवाण-घेवाण, ग्रामीण कलांचे सादरीकरण, ग्रामीण खेळ असा उपक्रम असेल. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे, ज्येष्ठ गझलकार म.भा. चव्हाण, लेखक अतुल कहाते, नीलिमा बोरवणकर असे काही प्रसिद्ध साहित्यिक / कलाकार परिक्रमेत सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत निसर्गरम्य परिसरात चालण्याची आनंददायी अशी ही संधी आहे.

६) निवासाच्या ठिकाणी आपले अंथरूण पांघरूण स्वतः आणायचे आहे. ताट, वाटी व्यवस्था आहे. चहा, नाश्ता आणि कोकणातील स्थानिक शाकाहारी साधे घरगुती भोजन अशी व्यवस्था आहे.

७) परिक्रमेला सुरुवात करण्यासाठी शुक्रवारी दिनांक २८ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजेपर्यंत साखरपा जि. रत्नागिरी येथे स्वखर्चाने पोहोचणे अपेक्षित आहे. पुणे ते साखरपा सशुल्क वाहन व्यवस्था करण्यात येणार आहे. तुम्ही स्वतः ही कोकण रेल्वे, बस / इतर वाहनाने तिथे पोहचू शकता. एसटीने साखरपा हे स्थानक तर रेल्वेने येण्यासाठी विलवडी हे जवळचे ठिकाण आहे. कोकणकन्याआणि तुतारी या रेल्वेगाड्या विलवडी स्थानकावर थांबतात. तिथून प्रभानवल्ली हे अंतर २० किमी. आहे. रिक्षा जीप अशी वाहने उपलब्ध असतात.

८) *सर्वात महत्त्वाचे - परिक्रमा झाल्यावर प्रत्येक सहभागी व्यक्तिला सुमारे २००० शब्दांमध्ये परिक्रमेतील अनुभवांवर आधारित प्रवासवर्णन, लेख, कथा अशा प्रकारचे साहित्य लिहावे अशी अपेक्षा आहे. हे लेखन विश्व मराठी परिषदेतर्फे प्रकाशित केले जाईल*.

९) या उपक्रमाचे आयोजक विश्व मराठी परिषद ही संस्था असून अखिल भारतीय साहित्य परिषद आणि इतर काही संस्था सहकार्य करीत आहेत.

१०) परिक्रमेमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी. *नोंदणीची अखेरची तारिख १५ ऑक्टोबर २०२२ ही आहे.*

परिक्रमेची सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. फोनवर संपर्क करण्यापूर्वी वेबसाईटला भेट द्यावी.

www.vishwamarathiparishad.org/ssjparikrama

संपर्क: अपूर्वा राऊत - 9309462627

स्वाती यादव - 9673998600
अब तक छप्पन्न...!
आता एकदम छप्पन्न...!!!

*विश्व मराठी परिषदेतर्फे क्षमता आणि कौशल्ये विकसित करणाऱ्या ५६ ऑनलाईन कार्यशाळांचे आयोजन!!!* ( काही कार्यशाळा मोफत )

https://www.vishwamarathiparishad.org/karyshala

सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रँड निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या विश्व मराठी परिषदेतर्फे २१ फेब्रुवारी ते ११ ऑगस्ट,२०२३ या कालावधीत सर्व वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त अशा ५६ ऑनलाईन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी क्षमता आणि कौशल्ये विकसित करणाऱ्या या ५६ कार्यशाळांमध्ये अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रत्येक कार्यशाळेचा कालावधी चार दिवस असून वेळ ही रात्री ८ ते ९ अशी असेल . कार्यशाळांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार आहे. यातील १० कार्यशाळा निःशुल्क असून इतर कार्यशाळांसाठी प्रत्येक कार्यशाळेसाठी रू. ७५०/- इतके आणि विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांसाठी वीस टक्के सवलत म्हणजे रू. ६००/- इतके माफक शुल्क ठेवण्यात आले आहे.

कार्यशाळांचे विषय कथालेखन, कादंबरी, ब्लॉग,फेसबुक लेखन, अनुवाद, निवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखत, कविता, सेल्फ पब्लिकेशन, ललितेतर लेखन, यशस्वी उद्योजकता, ऑनलाईन पत्रकारिता, पॉडकास्ट, यु ट्यूब चॅनेल, करियर प्लॅनिंग, मुलाखत तंत्र, आर्थिक आणि निवृत्ती नियोजन, पटकथा / वेब सीरिज लेखन, माहिती अधिकार कायदा - सजग नागरिक, भांडवल उभारणी - क्राउड फंडिंग, म्युझिक थेरपी, गर्भ संस्कार, व्यवसाय कसा सुरु करावा ?, टुरिझम आणि ॲग्रो टुरिझम व्यवसाय, स्वरसंस्कार आणि संवर्धन, डॉक्युमेंटरी / शॉर्टफिल्म, थिंक पॉझिटिव्ह-सकारात्मक जीवनशैली, समाजकार्य- एन.जी.ओ स्थापना, दुर्ग भ्रमण-गिर्यारोहण-साहसी खेळ, इ. असून *व्यक्तित्व आणि चारित्र्य निर्माण, जीवनाचे व्यवस्थापन, कुटुंब व्यवस्था पद्धती, विवाह संस्कार आणि उद्योजक - व्यावसायिक बना* या कार्यशाळा निःशुल्क आहेत.

कार्यशाळा करून यशस्वी होता येत नाही. मात्र ज्यांना जीवनात यशस्वी व्हायचे आहे त्यांना कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरतात. कारण कार्यशाळांमध्ये अनुभवी व्यक्तींचे अनमोल मार्गदर्शन मिळते. विश्व मराठी परिषदेच्या या उपक्रमामध्ये डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, उस्ताद उस्मान खां, विवेक वेलणकर, राजेंद्र खेर, चारुदत्त आफळे, अनिल कुलकर्णी, लीना सोहनी, अभय भंडारी, प्रा. क्षितिज पाटुकले, उमेश झिरपे, अतुल कहाते, नीलिमा बोरवणकर, शैलेंद्र बोरकर, प्रभाकर भोसले, विघ्नेश जोशी, अजित आपटे, ओंकार दाभाडकर, भालचंद्र कुलकर्णी, श्रीनिवास भणगे, डॉ.अंजली दाणी, डॉ. स्मिता कुलकर्णी, रवींद्र खरे, महेश शेंद्रे, तुषार जाधव, इ. दिग्गज नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शक, मार्गदर्शन करणार आहेत.

विश्व मराठी परिषदेने आतापर्यंत विविध विषयांवर ऑफलाईन आणि ऑनलाईन कार्यशाळा घेतल्या असून त्यामध्ये देश विदेशातील १२,००० हून अधिक मराठी भाषिक बंधू भगिनींनी सहभाग नोंदवला आहे. यातील सहभागी विद्यार्थ्यांनी यशस्वी वाटचाल सुरू केली असून अनेकांची पुस्तके प्रकाशित झाली, अनेकांनी ब्लॉग सुरु केले, उद्योग व्यवसाय सुरू केले. आपल्यामधील क्षमतांचा, कौशल्यांचा विकास होण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या जीवनात भरीव कामगिरी करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या या कार्यशाळा आहेत. विश्व मराठी परिषद लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करणार आहे.

खाली दिलेल्या लिंकवर कार्यशाळांबद्दल सविस्तर माहिती आणि सर्व कार्यशाळांचे वेळापत्रक उपलब्ध आहे. ऑनलाईन नोंदणी करून सहभागी होता येईल. कार्यशाळा ऑनलाईन असल्याने महाराष्ट्रातील, भारतातील विविध राज्यातील आणि भारताबाहेरील विविध देशांतील मराठी भाषिकांनी यामध्ये सहभागी व्हावे. तसेच फक्त एकदाच रू. ८००/- भरून विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासद व्हावे असे आवाहन परिषदेचे मुख्य संयोजक प्रा. अनिकेत पाटील यांनी केले आहे.

https://www.vishwamarathiparishad.org/karyshala

*कार्यशाळांची माहिती व्हॉटसअपद्वारे मागवण्यासाठी 7066251262 यावर "कार्यशाळा" असा व्हॉटसअप संदेश पाठवा.*

अधिक माहितीसाठी संपर्क : विश्व मराठी परिषद, पुणे - 9673998600 आणि 9309462627

कृपया हा संदेश अधिकाधिक शेअर करावा ही विनंती.
*यशस्वी कथालेखक बना...*

विश्व मराठी परिषद, आयोजित एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा
*"यशस्वी कथालेखक बना...!"*

*मार्गदर्शक:* नीलिमा बोरवणकर (सुप्रसिद्ध कथालेखिका)

*दिनांक:* 21 ते 24 फेब्रुवारी 2023
*वेळ:* रात्री 8 ते 9
*कालावधी:* चार दिवस, रोज एक तास
*ऑनलाईन वर्ग:* Zoom द्वारे

*कार्यशाळेतील विषय:*
1) कथा म्हणजे काय?
2)कथा, गोष्ट, अनुभवकथन, लेख यातील फरक
3) कथालेखनाचा उद्देश, आवाका, आणि अभ्यास
4) कथेचा जन्म व कथाबीज
5) कथालेखनाचे प्रकार
6) कथालेखनाचे तंत्र - वातावरण निर्मिती व संवाद लेखन
7) उत्तम कथाकार कसे होता येईल?
8) यशस्वी कथा व कथाकार यांची वैशिष्टये

*सहभाग शुल्क :* रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)

*👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:*
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/katha
2) पेजवरील *RRGISTER NOW* येथे क्लिक करा.
3) *BUY TICKETS* वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. *NEXT* वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

*मर्यादित प्रवेश*
*त्वरित ऑनलाईन नोंदणी करा*

*सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...*

*👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी:* www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

*संपर्क - मोबाईल*
स्वाती यादव - समन्वयक
9673998600

*व्हॉट्सॲप*
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
*यशस्वी अनुवादक बना...*
*अनुवाद क्षेत्रात व्यावसायिक करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी*
विश्व मराठी परिषद आयोजित,
*ऑनलाईन कार्यशाळा*

*"अनुवाद कसा करावा?"*
प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तरांसहित...

*मार्गदर्शक* : लीना सोहोनी (सुप्रसिद्ध लेखिका व अनुवादिका)

*दिनांक:* 21 ते 24 फेब्रुवारी 2023
*वेळ:* रात्री 8 ते 9
*कालावधी:* चार दिवस, रोज एक तास
*ऑनलाईन वर्ग :* Zoom द्वारे

*कार्यशाळेतील विषय:*
1) अनुवाद म्हणजे काय?
क्षेत्रातील संधी
2) अनुवादाचे प्रकार
3) उत्तम अनुवादकाची साहित्यिक कौशल्ये
4) अनुवाद कौशल्य विकासासाठी नियमित अभ्यास पद्धती
5) अनुवाद करताना घ्यावी लागणारी काळजी
6) अनुवादकाचे स्वतंत्र, जबाबदारी व मर्यादा
7) अनुवाद करताना होणाऱ्या चुका व परिणाम
8) उत्तम व यशस्वी अनुवाद तसेच फसलेला अनुवाद कसा ओळखावा?
9) अनुवादित पुस्तक प्रकाशन प्रक्रिया
10) पुस्तकांच्या अनुवादाव्यतिरिक्त अनुवाद क्षेत्रे व संधी

*सहभाग शुल्क :* रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)

*👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:*
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/anuvad
2) पेजवरील *REGISTER NOW* येथे क्लिक करा.
3) *BUY TICKETS* वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. *NEXT* वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

*मर्यादित प्रवेश*
*त्वरित ऑनलाईन नोंदणी करा*

*सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...*

*👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी:* www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

*संपर्क - मोबाईल*
स्वाती यादव - समन्वयक
9673998600

*व्हॉट्सॲप*
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
*यशस्वी निवेदक बना...*
*यशस्वी सूत्रसंचालक बना...*
*यशस्वी मुलाखतकार बना...*
*यशस्वी उद्घोषक बना...*

विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा

*निवेदन, सूत्रसंचालन व मुलाखतकार कार्यशाळा*

*मार्गदर्शक:*
*विघ्नेश जोशी*
प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार

*दिनांक:* 21 ते 24 फेब्रुवारी 2023
*वेळ:* रात्री 8 ते 9
*कालावधी:* चार दिवस, रोज एक तास
*ऑनलाईन वर्ग:* Zoom द्वारे

*कार्यशाळेतील विषय*
1) निवेदन म्हणजे नक्की काय? निवेदकाची जबाबदारी
2) निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार यातील फरक
3) दूरदर्शन, आकाशवाणी, सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनातील फरक व समानता
4) कार्यक्रम स्वरूप व ठिकानाची पूर्व तयारी
5) कार्यक्रम पूर्व अभ्यास, वाचन, लेखन यांची तयारी व उजळणी
6) निवेदकाचे व्यक्तिमत्व स्वर, आवाज, कपडे इ.
7) कार्यक्रमादरम्यानची निरीक्षण नोंदी
8) निवेदन क्षेत्रातील व्यावसायिक संधी
9) आवश्यक नियमित व्यायाम व साधना
10) विविध संकल्पना व प्रात्यक्षिके

*सहभाग शुल्क :* रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)

*👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:*
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/nivedan
2) पेजवरील *REGISTER NOW* येथे क्लिक करा.
3) *BUY TICKETS* वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. *NEXT* वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

*मर्यादित प्रवेश*
*त्वरित ऑनलाईन नोंदणी करा*

*सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...*

*👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी:* www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

*संपर्क - मोबाईल*
स्वाती यादव - समन्वयक
9673998600

*व्हॉट्सॲप*
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
*यशस्वी ब्लॉगर बना...*
व्यावसायिक ब्लॉगलेखन करा...

विश्व मराठी परिषद आयोजित एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा

*ब्लॉगलेखन कसे करावे ?*
(प्रश्नोत्तरे व प्रात्यक्षिकांसहित)

*मार्गदर्शक:*
*ओंकार दाभाडकर* (प्रसिद्ध ब्लॉगर व संस्थापक - InMarathi.Com)

*दिनांक:* 28 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023
*वेळ:* सकाळी 7.30 ते 8.30
*कालावधी :* चार दिवस, रोज एक तास
*ऑनलाईन वर्ग :* Zoom द्वारे

*👉ऑनलाईन नोंदणी करा :*
www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/bloger

*कार्यशाळेतील विषय*
1) ब्लॉगलेखन म्हणजे काय?
2) ब्लॉगलेखनाचे प्रकार
3) ब्लॉग, वेबसाईट, फेसबुक पेज यातील फरक व समानता
4) नियमित ब्लॉग लेखनासाठीचे विषय, अभ्यास व तयारी
5) ब्लॉग निर्मिती प्रक्रिया (प्रात्यक्षिक)
6) ब्लॉग लेखनासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान (SEO, Google Analytics)
7) कमर्शियल ब्लॉगिंग म्हणजे काय?, अर्थार्जनाच्या विविध संधी
8) ब्लॉग प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर
9) यशस्वी ब्लॉगर कसे बनावे ?

*सहभाग शुल्क :* रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)

*👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:*
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/bloger
2) पेजवरील *REGISTER NOW* येथे क्लिक करा.
3) *BUY TICKETS* वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. *NEXT* वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

*मर्यादित प्रवेश*
*त्वरित ऑनलाईन नोंदणी करा*

*सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेच्या सविस्तर नोट्स मिळतील...*

*👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी:* www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

*संपर्क - मोबाईल*
स्वाती यादव - समन्वयक
9673998600

*व्हॉट्सॲप*
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
*यशस्वी लेखक बना*

*लेखक म्हणून नाव कमवा, किर्ती मिळवा आणि आर्थिक समृद्धी मिळवा...* *यशस्वी व्यावसायिक लेखक बना...*

विश्व मराठी परिषद आयोजित
ऑनलाईन कार्यशाळा

*मार्गदर्शक :*
*अतुल कहाते* (सुप्रसिद्ध लेखक, संशोधक)

*दिनांक:* 28 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023
*वेळ:* रात्री 7.30 ते 8.30
*कालावधी:* चार दिवस, रोज एक तास
*ऑनलाईन वर्ग:* Zoom द्वारे

*कार्यशाळेतील विषय:*
1) यशस्वी व्यावसायिक लेखक म्हणजे काय ?
2) लेखनाचा विषय, लेखन प्रकार कसा निवडावा ?
3) साहित्यिक जडणघडण, कौशल्ये व अभ्यास
4) प्रकाशकांना प्रस्ताव कसा पाठवावा ?
5) लेखक - प्रकाशक करार कसा असतो ? करार करताना कोणती काळजी घ्यावी ?
6) रॉयल्टी कशी, कधी आणि किती मिळते ? रॉयल्टीचा हिशोब कसा मिळतो ? छापील पुस्तकांच्या रॉयल्टी शिवाय कोणते आणि कसे उत्पन्न मिळते ?
7) ISBN क्रमांक कसा मिळवावा?
8) कॉपीराईट,
9) ई - कार्यक्षम लेखक
10) लेखकाचे ऑनलाईन बुक स्टोअर
11) लेखनातून संपत्ती निर्माण

*सहभाग शुल्क :* रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)

*👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:*
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/lekhak
2) पेजवरील *REGISTER NOW* येथे क्लिक करा.
3) *BUY TICKETS* वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. *NEXT* वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

*मर्यादित प्रवेश*
*त्वरित ऑनलाईन नोंदणी करा*

*सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...*

*👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी:* www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

*संपर्क - मोबाईल*
स्वाती यादव - समन्वयक
9673998600

*व्हॉट्सॲप*
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
*📚सस्नेह निमंत्रण : प्रकाशन समारंभ📖*

डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या _श्रेष्ठ, दर्जेदार आणि दुर्मिळ संहिता समजले गेलेल्या, 'चिमण्या,टरफले आणि सैगल व इतर एकांक' आणि 'सुवर्णपर्वताच्या पल्याड व इतर एकांक ह्या दोन एकांक संग्रहांचा
प्रकाशन समारंभ

▪️हस्ते व अध्यक्ष
*सतीश आळेकर* (ख्यातनाम रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक)

▪️भाष्य
प्रा. मिलिंद जोशी (प्रख्यात वक्ते व कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद)
संतोष शेणई (ख्यातनाम कवी)
शुभांगी दामले(रंगकर्मी)

🗓️तारीख: बुधवार , दि. १५ मार्च २०२३ रोजी
🕡वेळ: संध्याकाळी ६.३० ते ८.००  वाजता
👉ठिकाण : सुदर्शन रंगमंच, मोतीबाग कार्यालयाजवळ, हसबनीस बखळ, शनिवार पेठ, पुणे –३०

गूगल मॅप लोकेशन : https://g.co/kgs/VeZ7WK

आयोजक :                                                           
विश्व मराठी परिषदेचे संस्थापक संचालक अनिल कुलकर्णी आणि वर्णमुद्रा प्रकाशनाचे मनोज पाठक यांनी या कार्यक्रमाला साहित्य,नाट्य व रंगभूमी प्रेमींनी आवर्जून उपस्थित रहावे असे नम्र आवाहन केले आहे.
भांडवल उभारणी कशी करावी ?
विश्व मराठी परिषद आयोजित
अभिनव ऑनलाईन कार्यशाळा

हिंमत आहे, बुद्धी आहे, चांगल्या कल्पना(आयडिया) आहेत आणि याउप्पर अविरत कष्ट करायची तयारी आहे. पण काय करायचे, भांडवल नाही... माझ्याजवळ भांडवल नाही म्हणून मला कोणताही व्यवसाय किंवा उद्योग सुरू करता येत नाही, अशीच बहुतेकांची व्यथा असते आणि मग अशाच नकारात्मक विचारांमध्ये मिळेल ती नोकरी करत आणि स्वतःच्या नशिबावर चरफडत माणस आयुष्य जगताना आपल्याला दिसतात. भांडवल उभे करणे अवघड आहे पण अशक्य नाही. भांडवल गोळा करायच्या अनेक पद्धती आणि अनेक मार्ग आहेत. भांडवल उभारणीचे विविध मार्ग शिकवणारी ही कार्यशाळा प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त आहे. केवळ उद्योग, व्यवसायाच नव्हे तर सामाजिक कार्य, मंदिरे, वृद्धाश्रम, शिक्षण, आरोग्य इ. प्रकल्पांसाठी आणि स्वतःचे घर बांधण्यासाठी भांडवल कसे उभे करायचे याचा उहापोह या कार्यशाळेमध्ये केला जाणार आहे.

भांडवल उभारणी कशी करावी ?

▪️मार्गदर्शक:
प्रा. क्षितिज पाटुकले (सुप्रसिद्ध लेखक, वक्ता, अर्थतज्ज्ञ, कल्पक उद्योजक, संचालक - भीष्म स्कूल ऑफ इंडीक स्टडीज)
दिनांक: 18 ते 21 एप्रिल 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी:bचार दिवस, रोज एक तास
ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

▪️ कार्यशाळेतील विषय
1) भांडवल म्हणजे नक्की काय ?
2) भांडवलाचे विविध प्रकार
3) नक्की भांडवल किती लागेल याचा ठोकताळा कसा घ्यायचा ?
4) भांडवल उभारण्याचे विविध मार्ग
5) भांडवल उभारणीतील टप्पे
6) भांडवल उभारणीमधील जोखिमा
7) सरकारी योजना, अनुदाने इ.
8) बँकेकडून भांडवल कसे उभे करायचे ?
9) सहकारी संस्था कशा भांडवल गोळा करतात ?
10) खाजगी PVT कंपन्या कशा भांडवल गोळा करतात ?
11) क्राउड-फंडींग - समूह भांडवल, व्हेंचर कॅपिटल इ.
12) देणग्या आणि विदेशातून भांडवल उभारणी, इ.

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/capitalraising
2) पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
3) BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या

संपर्क
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य संयोजक
विश्व मराठी परिषद
7507207645
🎼संगीतोपचार अर्थात म्युझिक थेरपी
विश्व मराठी परिषद आयोजित
अभिनव ऑनलाईन कार्यशाळा

मार्गदर्शिका :
डॉ. अंजली दाणी (ज्येष्ठ संगीतोपचार तज्ज्ञ)

संपूर्ण विश्व हे स्पंदनांनी भरलेले आहे असे आजचे आधुनिक विज्ञान आपल्याला सांगते. Vibrations... तरंग.. त्यातून निर्माण होणारे नाद, प्रतिनाद यातून सर्व विश्व गतिमान होते. हे तरंग संपूर्ण विश्र्वामध्ये, ब्रम्हांडामध्ये निनादत असतात, एकमेकांवर परिणाम करीत असतात. आजचे मॉडर्न क्वांटम फिजिक्स हेही यावर शिक्कामोर्तब करते. प्राचीन भारतीयांनी संगीताचा आणि संगीतशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता. संगीतातील राग आणि आलाप, त्यातील नाद, त्यांचा मानवी शरीराबरोबर, विविध इंद्रियांबरोबर, अवयवांबरोबर असलेला संबंध त्यांनी अभ्यासला होता. शास्त्रीय संगीताबद्दल माहिती देणारे संगीत रत्नाकर, रागोपनिषद सारखे ग्रंथ यावर विस्तृत विवेचन करतात. भारतीय शास्त्रीय संगीतवर आधारित संगितोपचार अर्थात म्युझिक थेरपी ही विविध प्रकारच्या आजारांवर आणि व्याधींवर अतिशय उपयुक्त अशी उपचारपद्धती आहे. संगितोपचार ही एक सहाय्यकारी थेरपी आणि पूरक थेरपी आहे.
------------------------
आजच्या आधुनिक जगामध्ये काही आजार तर कायमचेच मुक्कामाला येऊन बसले आहेत (उदा. बीपी, डायबिटीस इ.) तर काही आजार इतके दुर्धर आणि असाध्य आहेत की त्यांच्यावर आधुनिक ॲलोपॅथी उपचार पद्धतीमध्ये कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. उदा. कॅन्सर, हृदयरोग, अल्झायमर, इ. या यातील अनेक आजार मनोकायिक म्हणजे सायको सोमॅटिक आहेत. गतिमान जीवनशैली, मानसिक ताणतणाव यातून या व्याधी निर्माण झाल्या आहेत. अशा प्रकारच्या मॉडर्न आजारांमध्ये रुग्ण अनेकदा असहाय्य आणि हतबल दिसून येतात. गेल्या काही वर्षामध्ये अशा अनेक आजारावर उपयुक्त थेरपी म्हणून म्युझिक थेरपी लोकप्रिय होत आहे. आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये संगीताचे हे महात्म्य लोकांना माहीत होते. त्यामुळे दैनंदिन दिन:चर्येतही प्रत्येकाने काही काळ संगीत श्रवण करावे असे सांगून ठेवलेले आहे. दिवसाच्या विविध प्रहरांमध्ये कोणते राग गावेत, प्रत्येक रागाचा स्वभाव कसा आहे, त्याचा परिणाम कसा होतो, त्याचा किती प्रमाणात वापर केला पाहिजे याचा विस्तृत अभ्यास त्याकाळी झालेला आढळतो. कोणत्या रागाचा कोणत्या अवयवाशी संबंध आहे, कोणत्या इंद्रियाशी संबंध आहे हे त्यांना माहीत होते. त्यातूनच म्युझिक थेरपी ही संकल्पना विकसित झाली आहे. याचा उपयोग झाल्याची शेकडो उदाहरणे आता उपलब्ध आहेत. विशेषतः संगीत क्षेत्रातील विद्यार्थी, गायक, वादक, कलाकार तसेच डॉक्टर्स, वैद्य, नर्सेस, थेरपीस्ट या सर्वांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर विविध आजारांनी ग्रस्त अशा रुग्णांसाठीही ही कार्यशाळा उपयुक्त आहे. अर्थात सर्वसामान्य लोकांसाठीही ही कार्यशाळा अत्यंत उपयोगी आणि ज्ञानात भर घालण्यासाठी आहे, असा विश्वास आहे...

मार्गदर्शिका:
डॉ. अंजली दाणी (ज्येष्ठ संगीतोपचार तज्ज्ञ)
दिनांक: 18 ते 21 एप्रिल 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

*कार्यशाळेतील विषय:*
1) भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख
2) संगीतोपचार अर्थात म्युझिक थेरपी या संकल्पनेची ओळख
3) संगीतोपचाराची मूलतत्त्वे
4) संगीतोपचार कशा प्रकारे काय करतात
5) संगीतोपचार कोणी घ्यावेत ? कधी घ्यावेत ?
6) निरोगी माणसाने संगीत ऐकावे का?
7) संगीतोपचाराची उदाहरणे
8) संगीतोपचाराची व्याप्ती, उपयुक्तता आणि मर्यादा
9) संगीतोपचारतील करिअर संधी

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/musictherapy
2) पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
3) BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या

संपर्क
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य संयोजक
विश्व मराठी परिषद
7507207645
गर्भ संस्कार
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा

अभिमन्यूची गोष्ट आपल्याला माहीत आहे. मातेने आपल्या पोटामध्ये गर्भ धारण केल्यापासून त्याच्या शिक्षणाला सुरवात होते असे भारतीय संस्कृतीमध्ये मानले गेले आहे. षोडश संस्कारांमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध संस्काराचे वर्णन केलेले आहे. उत्तम आणि निरोगी संतती हे सर्वात मोठे भाग्य मानले गेले आहे. आपले मूल हे सद्गुणांनी संस्कारित असावे, हुशार, बुद्धिमान, चतुर असावे, विविध क्षमातांनी परिपूर्ण असावे असे प्रत्येक मातपित्याला वाटते. त्याने चांगले जीवन जगावे, आपल्याला वृद्धपणाला आधार द्यावा. याची सुरवात गर्भ संस्कारापासून केली जाते. गर्भसंस्कार करून उत्तम संतती प्राप्त केल्याची शेकडो उदाहरणे आपल्याला आजच्या काळात उपलब्ध आहेत. प्रत्येक विवाहितांनी तर गर्भसंस्कारांची माहिती करून घेतलीच पाहिजे. पण त्याशिवाय इतर सर्वांनीही या अत्यंत विलक्षण विषयाची माहिती करून घेतली पाहिजे. डॉ. स्मिता कुलकर्णी या आपल्याला या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

◻️मार्गदर्शक:
डॉ. स्मिता कुलकर्णी
मानसतज्ज्ञ, समुपदेशक, योग प्रशिक्षक, स्वेच्छानिवृत्त उपजिल्हाधिकारी

◻️कार्यशाळेतील विषय:
1) गर्भसंस्कार म्हणजे काय ? विस्तृत संकल्पना
2) गर्भसंस्काराचे स्वरूप आणि प्रक्रिया
3) गर्भधारणेची पूर्वतयारी आणि गर्भाधान
4) गर्भसंस्कारामागचे संदर्भ आणि कथा,गोष्टी
5) गर्भसंस्कार कधी करू सुरू करायचे ? कधीपर्यंत करायचे ?
6)गर्भसंस्कारातील मंत्रोच्चार आणि स्वरसंगीताचे महत्त्व
6) गर्भवतीची काळजी- पोषक आहार,आवर्जून करण्यासारखे काही
7) गर्भ जोपासना आणि मुलांचे भविष्य
8) पालकांचा गर्भसंस्काराकडे पाहण्याचा दृष्टिकोन
9) गर्भसंस्काराचे फायदे आणि मर्यादा
10) गर्भसंस्कार आणि सुदृढ समाजनिर्मिती

मर्यादित जागा. त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

दिनांक: 25 ते 28 एप्रिल, 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

👉खालील संकेतस्थळाला भेट देऊन आपण या कार्यशाळेसाठी नोंदणी करावी तसेच हा मेसेज अधिकाधिक लोकांना शेअर करावा.

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/garbhsanskar
2) पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
3) BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून नोंदणी पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
📍करिअर प्लॅनिंग कार्यशाळा

विश्व मराठी परिषद आयोजित
ऑनलाईन कार्यशाळा

दहावी, बारावी, पदवीधर विद्यार्थी व पालकांसाठी दिशादर्शक मार्गदर्शन

▪️मार्गदर्शक: विवेक वेलणकर

आजच्या काळातली वाढत्या स्पर्धेमुळे करीअर प्लॅनिंग हा घराघरातील चर्चेचा आणि चिंतेचा विषय झाला आहे. अनेकदा करिअर म्हणजे केवळ डॉक्टर, इंजिनिअर, आयटी, सीए, वकील याच क्षेत्रांविषयी माहिती असते. थोड्याफार प्रमाणात सैन्यदले, यूपीएससी, एमपीएससी याची करिअर नियोजनामध्ये गणना होते. मात्र एखाद्या व्यक्तीचे करिअर म्हणजे नक्की काय ? याची फारच थोड्या लोकांना माहिती असते. विद्यार्थीदशा संपल्यावर करिअर नियोजन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपल्यातील कौशल्ये आणि क्षमता सतत वाढवणे, विकसित करणे गरजेचे असते. तुमची आवड व क्षमता ओळखली आहे का? तुमच्यातील क्षमतांना तुम्ही न्याय दिला आहे का ? हा विचार करिअरचा विचार करताना महत्वपूर्ण ठरतो. करिअरची अगणित आहेत. करिअरची उद्दिष्टे आणि गरजा वयोमानाप्रमाणे जीवनाच्या विविध टप्प्यांवर बदलत जातात. त्या त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. ही कार्यशाळा एका नवीन आणि क्रांतिकारी विचाराची तुम्हाला ओळख करून देईल. करिअरच्या या नवीन विषयांनी तुमच्या विचारांना नक्कीच चालना मिळेल. सर्व वयोगटातील प्रत्येकासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरेल.

▪️मार्गदर्शक :
विवेक वेलणकर ( करीअर प्लॅनिंग, आय टी तच जायचंय , स्वयंरोजगारातून समृद्धी कडे , दहावी/ बारावी नंतरची शाखा निवड या पुस्तकांचे लेखक, आजवर महाराष्ट्रात करीअर प्लॅनिंग या विषयावर एक हजारांहून अधिक व्याख्याने, या विषयावर विविध वृत्तपत्रांतून बाराशे हून अधिक लेख प्रसिद्ध)

दिनांक: 25 ते 28 एप्रिल 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

▪️कार्यशाळेतील विषय:
1) करीअर म्हणजे काय ?
2) सातवी / आठवी पासून करीअर प्लॅनिंग कसं करावं ?
3) दहावीनंतरची शाखा निवड
4) बारावीनंतर चे करिअरचे पर्याय
5) पदवीनंतर पुढे काय
6) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअर
7) संरक्षण क्षेत्रातील करिअर संधी
8) व्यावसायिक क्षेत्रातील करीअर्स
9) विज्ञान शाखेतून करीअर पर्याय
कला क्षेत्रातील करिअर संधी
10) कौशल्य विकासातून करीअर पर्याय
11) वाणिज्य क्षेत्रातील करिअर संधी
12) स्पर्धा परीक्षांमधील करीअर संधी आणि धोके
13) स्वयंरोजगारातून समृद्धी कडे

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/careerplanning
2) पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
3) BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
📍 सजग नागरिक बना...
माहितीचा अधिकार कायदा कार्यशाळा

विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा

सामान्य नागरिकांसाठी माहिती अधिकार कायद्याचे दिशादर्शक मार्गदर्शन

▪️मार्गदर्शक : विवेक वेलणकर (अध्यक्ष, सजग नागरिक मंच)

शासनयंत्रणा, राजकीय नेतृत्व, न्यायसंस्था आणि पत्रकारिता यांना लोकशाहीचे चार मुख्य स्तंभ म्हणून मानले जाते. मात्र लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवलेली व्यवस्था या लोकशाहीच्या व्याख्येतील सामान्य लोकांना मात्र लोकशाहीच्या स्तंभामध्ये कोणतेही स्थान नाही. त्यासाठी सजग नागरिक अर्थात जागरूक चौकीदारांची फार मोठी गरज आहे. मा. अण्णा हजारे यांनी भीम प्रयत्न करून माहितीचा अधिकार हा कायदा देशामध्ये आणला आणि लोकपाल कायद्यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. समाजातूनही अनेक सजग नागरिक आणि माहितीचा अधिकार तज्ज्ञ निर्माण होणे अतिशय आवश्यक आहे. मात्र ते नि:स्पृह, प्रामाणिक आणि संवेदनाशील असले पाहिजेत. या कार्यशाळेमध्ये आपण सजग नागरिक म्हणजेच जागरूक चौकीदार कसे बनावे, समाजाला कसे जागृत करावे, माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा कसा वापर करावा हे जाणून घेणार आहोत.

▪️मार्गदर्शक: विवेक वेलणकर (प्रख्यात माहिती अधिकार कार्यकर्ते, अध्यक्ष - सजग नागरिक मंच,
'ग्राहक राजा सजग हो' या पुस्तकाचे लेखक, आजवर पन्नास हजारांहून अधिक नागरिक व शासकीय कर्मचारी यांना माहिती अधिकार कायद्याचे प्रशिक्षण)

दिनांक: 3 ते 6 मे 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

*▪️कार्यशाळेतील विषय:*
1) माहिती अधिकार कायदा म्हणजे काय? पार्श्वभूमी आणि निर्मितीची कहाणी
2) माहिती अधिकार कायद्याची व्यवस्था, कार्यपद्धती आणि रचना
3) माहिती अधिकार कायद्याचा उपयोग कसा करायचा ?
4) माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून कसे काम करावे ? आव्हाने आणि संधी कोणत्या आहेत ? कोणती काळजी घ्यावी ?
5) माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार, चुकीच्या गोष्टी उघड कशा होतात याचे अनुभव
6) वीज कायदा , वीज ग्राहकांचे हक्क , वीज तक्रार निवारण व्यवस्था
7) बॅंक ग्राहकांचे हक्क , बॅंक तक्रार निवारण व्यवस्था
8) स्वयंपाकाचा गॅस ग्राहकांचे हक्क
9)ग्राहक संरक्षण कायदा , सेवा हमी कायदा , दप्तर दिरंगाई कायदा
10) रुग्णांचे हक्क

▪️सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/rti
2) पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
3) BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश... त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645